Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात आता थंडीची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात थोडीशी घट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील वातावरणात गारवा तयार झाला आहे.
एकंदरीत आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. पण हवामान खात्याने यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये थंडीचा जोर कमी राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअस अधिक राहणार असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतर थंडी वाढेल असं काही हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे.
दरम्यान राज्यातील जळगाव नासिक पुणे धुळे नंदुरबार सह विविध भागात सकाळच्या तापमानात घट पाहायला मिळत आहे. यामुळे सकाळी सकाळी थंडीची अनुभूती येत आहे. मात्र, दुपारी उन्हाचे चटके देखील सहन करावे लागत आहे.
त्यामुळे हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी देखील अजून तीव्र थंडीची लाट आलेली नाहीये. पण 15 नोव्हेंबर नंतर थंडी वाढू शकते असा अंदाज आहे.
अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि कोकणातील सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात पुढील दोन दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
या परिसरात आगामी दोन दिवस पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांनी सतर्क आणि अपेक्षित आहे. याशिवाय दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू मध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळच्या समुद्र किनार्यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडणार असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे. यासोबतच राज्यातील तापमानात देखील थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.