Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक महत्त्वाचा अंदाज सार्वजनिक केला आहे. यानुसार महाराष्ट्रात 7 जानेवारी पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून ते सात जानेवारीपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातील 22 जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे.
तसेच या संबंधित जिल्ह्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या हलक्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 17 जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील एकूण पाच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.
अशातच हवामान खात्याने पुढील तीन महिने म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात पावसाची परिस्थिती कशी राहणार, राज्यासह देशात किती टक्के पाऊस पडणार याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याने एलनिनो बाबत देखील महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
काय म्हणतय हवामान विभाग
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात तयार झालेली एलनिनो ची परिस्थिती मार्च 2024 पर्यंत कायम राहणार असा अंदाज आहे.
शिवाय चालू जानेवारी महिन्यामध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये देखील थंडीचे प्रमाण कमी राहू शकते असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये जवळपास 112 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
या तीन महिन्यात 69.7 मिमी एवढा पाऊस देशभरात पडू शकतो असा अंदाज आहे.तथापि पावसाचे प्रमाण भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये अधिक राहण्याचा अंदाज आहे.
एकंदरीत जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असे हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामातील पिकांना फटका बसू शकतो.
तथापि ज्या भागात मान्सून काळात चांगला पाऊस झालेला नाही त्या भागात जर समाधानकारक पाऊस पडला तर अशा दुष्काळग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे.