Maharashtra Havaman Andaj Skymet : गेल्या काही दिवसापासून देशातील वातावरणात मोठा चेंज पाहायला मिळत आहे. आपल्या महाराष्ट्रातही हवामानात मोठा चेंज आला आहे. आता राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे. सकाळचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. नासिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळचे तापमान कमी झाले असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार परिसरात तर बोचरी थंडी पडण्यास सुरवात झाली आहे.
अशातच मात्र स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने एक नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. 30 ऑक्टोबर पर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज स्कायमेटने बांधला आहे.
पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागातील हवामानात फारसा बदल जाणवणार नाही. थंडीची तीव्रता हळूहळू वाढत राहणार आहे. पण त्याच वेळी, तामिळनाडू, केरळ आणि माहेमध्ये आज 28 ऑक्टोबर 2023 रोजी मुसळधार पाऊस बसणार असल्याचे सांगितले जात आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत या भागात पावसासाठी पूरक परिस्थिती राहणार असून या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू किनारपट्टीजवळ दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाले आहे. तसेच, उत्तर म्यानमार आणि आजूबाजूच्या भागात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून या संबंधित भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. Skymet अनुसार, आज तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज या संस्थेने बांधला आहे. दक्षिण द्वीपकल्पात पावसाच्या हालचाली हळूहळू तीव्र होतील आणि पुढील ४८ तासांत (सुमारे २ दिवस) उत्तर-पूर्व मान्सून सक्रिय होईल, असे देखील त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचा विचार केला असता आपल्या राज्यात आता पावसाची शक्यता नाहीये.
काल-परवा हवामान खात्याच्या हवाल्यातून एका मीडिया रिपोर्टमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात किंवा बंगालच्या खाडीत पुन्हा एक चक्रीवादळ तयार होईल आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये राज्यात पाऊस बरसेल असे सांगितले गेले आहे. यामुळे आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.