शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी देशाला काय दिलं ? माजी कृषीमंत्री पवार यांच्या कामाची ‘ही’ लिस्ट एकदा पहाच, अख्या महाराष्ट्राला वाटेल अभिमान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Narendra Modi On Sharad Pawar : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदनगर दौरा होता. नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे काल मोदी यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला.

इतरही अन्य प्रकल्पांचे काल मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. दरम्यान कालच्या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. मोदी यांनी शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी देशाला काय दिल ? असं म्हणत माजी कृषिमंत्री पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर खूपच चर्चा पाहायला मिळत आहेत. खरंतर विरोधात असल्यामुळे पंतप्रधानांनी शरद पवारांवर टीका केली आहे हे समजले जाऊ शकते.

परंतु शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी देशाला काय दिलं ? हा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला असल्याने आज आपण शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्रात कोणकोणती कामे केली आहेत, यामुळे देशाला काय मिळाल आहे, पवार कृषी मंत्री असताना भारतातील शेती क्षेत्र किती समृद्ध झाले याबाबत आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पवार कृषी मंत्री असताना त्यांनी देशाला काय दिलं या पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र हे विधान फक्त राजकीय पार्श्वभूमीवर समोर आले आहे.

कारण की शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी केलेली काम खोडून काढता येऊ शकत नाही. UPA सरकारच्या काळात कृषिमंत्री पदी विराजमान असलेल्या पवारांनी कृषी क्षेत्रात खूपच उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कार्याची भुरळ संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संखेच्या महासंचालकांना देखील पडली होती.

2012 साली संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संखेचे तत्कालीन महासंचालक जोस ग्रॅझिआनो यांनी एक पत्र लिहून शरद पवारांचे आभार मानले होते. त्यांनी 2012 साली शरद पवारांना पाठवलेल्या पत्रात भारतातल्या छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी 100 दशलक्ष टन तांदूळ आणि 250 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन करून इतिहास घडवला आहे.

ही विक्रमी कामगिरी केल्याबद्दल तूमचे खास आभार असे गौरवउद्गार काढले होते. यामुळे शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी काय केलं ? हा प्रश्न राजकीयदृष्ट्या वाजवी असला तरीदेखील वस्तुस्थिती काही औरच आहे. 

शरद पवारांनी केलेली कामे खालील प्रमाणे

1) 23 मे 2004 रोजी शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. पवार 26 मे 2014 पर्यंत म्हणजेच तब्बल 10 वर्षे आणि 3 दिवस कृषी मंत्री म्हणून कार्यरत राहिलेत. खरंतर 2004 मध्ये ज्यावेळी यूपीए सरकार स्थापित होत होते तेव्हा शरद पवार यांना कोणते खाते हवे आहे याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवार अर्थ, संरक्षण किंवा यांसारख्या महत्त्वाच्या खात्याची मागणी करणार असे वाटत होते. मात्र शरद पवारांनी कृषी मंत्री हे खाते मागितले. यामुळे त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. काँग्रेसमधील ताकतवर नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील पवारांच्या या मागणीवर आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र शरद पवारांनी कृषी मंत्री पद स्वीकारताना एक अट घातली होती. 2004 पूर्वी पशुपालन, अन्नप्रक्रिया, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण व जलसंधारण अशी वेगवेगळी खाती असत. खरंतर ही सर्व खाती कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. यामुळे पवारांनी ही सर्व खाते त्यांच्याकडे मागितली. आणि पवारांनी केलेलं हे पहिलं काम ठरलं. त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व खाती एका छताखाली आलीत. यामुळे कामाची गती वाढली.

2) कृषिमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांनी कृषी वैज्ञानिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांच्या अशा लक्षात आले की कृषी क्षेत्रात संशोधन होत नाहीये. आय सी ए आर ही संस्था कृषी संशोधनासाठीची प्रमुख संस्था आहे. मात्र आयसीएआर आणि संबंधित संस्थेत त्यावेळी 500 पेक्षा जास्त संशोधकांची रिक्त पदे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी सर्वात आधी या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला.

3) यानंतर त्यांनी फूड अँड एग्रीकल्चर FAO या जागतिक संस्थेकडे आपला मोर्चा वळवला. वास्तविक, ही एक प्रमुख जागतिक संस्था आहे. येथे जगभरातील शास्त्रज्ञ एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे या संस्थेची व्यापकता वाढते. या संस्थेअंतर्गत भारतात वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. दरम्यान या संस्थेत जगभरातील संशोधकांसोबत भारतीय संशोधकांनी किमान तीन महिने काम करावे अशी अट पवारांनी घातली. यामुळे भारतात कृषी क्षेत्रात संशोधनाला चालना मिळाली. देशात कृषी क्षेत्रातील संशोधन वाढीस आले.

4)ICAR संस्थेअंतर्गत येणाऱ्या 80 संस्थांना स्वायत्तता दिली.

5)शरद पवारांच्या काळात कृषी विज्ञान केंद्रांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली. एका आकडेवारीनुसार 1974 ते 2004 दरम्यान भारतात 290 कृषी विज्ञान केंद्र होती. मात्र पवारांच्या काळात म्हणजे 2004 ते 2014 या काळात तब्बल 340 नवीन कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. म्हणजेच तीस वर्षात जेवढी कृषी विज्ञान केंद्र सुरू झाली नाही तेवढी कृषी विज्ञान केंद्र शरद पवारांच्या दहा वर्ष आणि तीन दिवसांच्या काळात सुरू झालीत.

6) शरद पवारांच्या दहा वर्षाच्या काळात 138 नवीन कृषी विद्यापीठ स्थापित झालीत.

7)शरद पवारांनी राष्ट्रीय फळबाग कार्यक्रम राबवला. पवार यांनी मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेची सांगड फळबागेसोबत घातली यामुळे फळबागा वाढल्यात, फळांचे उत्पादन वाढले.

8)शरद पवारांच्या काळात फळ उत्पादन विक्रमी वाढले होते. एका शासकीय आकडेवारीनुसार 2003-4 या काळात देशात 48.8 दशलक्ष मॅट्रिक टन एवढे फळाचे उत्पादन झाले होते. मात्र 2011-12 मध्ये हे उत्पादन 78 दशलक्ष मेट्रिक टन एवढे नमूद करण्यात आले. म्हणजेच त्यांच्या कार्यकाळात फळांच्या उत्पादनाचा ग्रोथ रेट 1.53 टक्क्यांवरून 6.4% एवढा वाढला.

9) भाजीपाला उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर 2003 मध्ये 143 दशलक्ष टन एवढे भाजीपाल्याचे आपल्या देशात उत्पादन घेतले जात असे. शरद पवारांच्या काळात, 2013 मध्ये भारतात 235 दशलक्ष टन एवढे भाजीपाल्याचे उत्पादन घेतले गेले.

10) शरद पवारांनी ब्रिंगिंग ग्रीन रेवोल्युशन टू ईस्टर्न इंडिया हे धोरण स्वीकारले. या धोरणाअंतर्गत ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आसाम अशा राज्यांत तांदूळ उत्पादन वाढीसाठी खास योजना राबवल्या गेल्यात. यामुळे तांदळाच्या उत्पादनात वाढ झाली. शरद पवार कृषिमंत्री असताना भारत तांदूळ निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश बनला. 2004 मध्ये 3.4 दशलक्ष टन एवढी तांदुळाची निर्यात होत होती मात्र 2012-13 मध्ये देशातून तब्बल दहा दशलक्ष टन एवढी तांदळाची निर्यात झाली.

11) देशातील एकूण शेतमाल निर्यातीचा विचार केला असता 2004 मध्ये भारतातून 6.2 अब्ज टन एवढी शेतमाल निर्यात झाली होती. परंतु शरद पवार कृषिमंत्री असताना 2012-13 मध्ये ही निर्यात 39 अब्ज टन पर्यंत वाढली.

12) कापसाच्या निर्यातीबाबत बोलायचं झालं तर 2003 मध्ये 15.1 दशलक्ष टन गाठी कापूस निर्यात झाली. मात्र शरद पवार कृषी मंत्री असताना 2012-13 मध्ये 34.6 दशलक्ष टन कापूस गाठीची निर्यात करण्यात आली. 

13) शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारखा ऐतिहासिक निर्णय घेतला.

14) केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा यांसारख्या राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंतची कर्जाची परतफेड केल्यास झिरो टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले.

15) शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांची समृद्धी वाढली होती. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरंच सुगीचे दिवस आले होते. त्या काळात वाढलेली ट्रॅक्टरची खप याचे एक सूचक आहे. एका आकडेवारीनुसार 2003-4 मध्ये एक लाख 71 हजार 657 ट्रॅक्टर खपले होते. मात्र 2013-14 मध्ये देशात सहा लाख 34,151 ट्रॅक्टरची खपत झाली होती. म्हणजेच ट्रॅक्टरच्या खप्पत मध्ये तब्बल 600 टक्क्यांची वाढ झाली होती.

16)शरद पवारांच्या काळात शेतीमालाच्या हमीभावात देखील विक्रमी वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या काळात तांदळाच्या हमीभावात 138 टक्क्यांची वाढ झाली, गव्हाच्या हमीभावात 122 टक्क्यांची वाढ झाली, कापसाच्या हमीभावात 114 टक्क्यांची वाढ झाली, सोयाबीनच्या हमीभावात 198 टक्क्यांची वाढ झाली आणि तुरीच्या हमीभावात 216 टक्क्यांची वाढ झाली.

Leave a Comment