Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशातील हवामानात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरंतर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते.
यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित अशी थंडी पाहायला मिळाली नाही. याउलट अवकाळी पावसाचे थैमान होते. आता मात्र राज्यासह देशातील काही भागांमध्ये गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे.
उशिरा का होईना पण थंडीला सुरुवात झाली असल्याने आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. राज्यातही काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागलेली आहे.
सकाळी गुलाबी थंडी अन दुपारी कडक ऊन असं हवामान राज्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
काही भागात जरूर ढगाळ हवामान कायम आहे, पण अवकाळी पाऊस आता कुठेच बरसत नाहीये. अशातच आता हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 48 तासात देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यां कालावधीत आपल्या राज्यातही पाऊस होणार असा अंदाज आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे, पण दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये आगामी 24 तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
तर देशाच्या पूर्वेकडील भागात धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. आता देशातील बहुतांशी राज्यात कमाल तापमानात मोठी घट आली आहे. याचा परिणाम म्हणून वातावरणात मोठा गारवा पाहायला मिळत आहे.
या भागात गारठा वाढणार
देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये 15 डिसेंबर पासून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान कमी होऊन हळूहळू थंडीचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये आज धुक्याची दाट चादर पाहायला मिळेल. इथेही तापमानात मोठी घट आली आहे.
कुठं बरसणार पाऊस
सिक्कीम राज्यातील काही भागांमध्ये आज पाऊस पडणार असा अंदाज आहे. यासोबतच नागालँड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषता तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप भागात आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.