Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मात्र परतीचा पाऊस महाराष्ट्रात मनसोक्त बरसलेला नाहीये. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पूर्णपणे संकटात आले आहेत.
कमी पावसामुळे आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची आणि पिकांचे उत्पादन कसे घ्यायचे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. एकतर आधीच कमी पावसामुळे खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये. सोयाबीन आणि कापसाचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याने शेतकरी बांधव पूर्णतः संकटात आहेत.
अनेकांना तर खरीप हंगामात केलेला खर्च देखील वसूल करता येणार नाहीये. शेतकऱ्यांना निदान परतीचा पाऊस तरी चांगला होईल आणि रब्बी हंगामातून बऱ्यापैकी उत्पादन मिळवता येईल असे वाटत होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही आशा देखील पूर्णपणे फोल ठरली आहे. मानसून माघारी फिरला आहे पण परतीचा पाऊस चांगला बरसला नाही. यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
अशातच मात्र अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाला तेज असे नाव ठेवण्यात आले आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस पडणार का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांच्या याच प्रश्नाचे सविस्तर असे उत्तर दिले आहे.
काय म्हणतंय पुणे हवामान विभाग ?
पुणे वेधशाळेने अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे, हे तेज चक्रीवादळ २६ ऑक्टोबरनंतर ओमानच्या दिशने रवाना आहे. हे चक्रीवादळ पुढे दक्षिण पाकिस्तानात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच या अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी या चक्रीवादळाचा आपल्या राज्यावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रावर परिणाम करणार नसून दक्षिण बांगलादेशाच्या दिशने निघून जाईल असे त्यांनी सांगितले आहे. तसेच बांगलादेशच्या पुढे हे ओमानकडे जाणार आहे. एकंदरीत तेज चक्रीवादळाचा आपल्या राज्यावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.