Maharashtra Kanda Market News : कांदा हे एक नगदी पीक आहे. मात्र कांदा बाजाराचा लहरीपणा हा कायमच शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. या चालू वर्षात फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये देखील बाजारामध्ये कांद्याच्या दरातील लहरीपणा पाहायला मिळाला आहे.
खरतर जानेवारी महिन्यात कांद्याला समाधानकारक दर मिळत होता. मात्र तदनंतर बाजारभावात घसरण सुरू झाली. फेब्रुवारी महिन्यापासून दरात घसरण सुरू झाली आणि जून महिन्यापर्यंत बाजार दबावतच राहिला. विशेषता फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत कांद्याला खूपच कवडीमोल भाव मिळाला.
त्या कालावधीत कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात विकला गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र या चालू महिन्यात कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. आता जवळपास 20 ते 25 दिवसांपासून कांदा बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
काल देखील राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळाला आहे. विशेष म्हणजे काल 27 जुलै 2023 रोजी राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील सर्वोच्च बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरातील ही तेजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांना तब्बल पाच ते सहा महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला 3200 चा भाव
चंद्रपूर गंजवड एपीएमसी मध्ये काल झालेल्या लिलावात 84 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. कालच्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2000 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये काय भाव मिळाला
काल अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 हजार 549 कांदा गोण्याची आवक झाली. यात एक नंबरच्या मालाला 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबर मालाला 805 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबर मालाला 100 रुपये ते 800 रुपये एवढा भाव नमूद करण्यात आला.
तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला आहे. मात्र कालच्या लिलावात या एपीएमसी मध्ये अपवादात्मक 34 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये, 40 गोण्यांना 1 हजार 900 रुपये तर 73 गोण्यांना 1 हजार 800 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.