Maharashtra Longest Bridge : गेल्या एका दशकात महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर शासनाने जोर दिला आहे. या अंतर्गत राज्यात रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शहरा शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण केली जात आहेत.
याशिवाय दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी नवनवीन लोहमार्ग तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाई स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात लोकलचा विस्तार केला जात आहे. मेट्रो सुरू केल्या जात आहेत.
विशेषतः राजधानी मुंबई आणि उपनगरात रस्ते विकासाची सर्वाधिक कामे सुरू आहेत. मुंबईमध्ये देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज देखील तयार केला जात आहे. दरम्यान या सागरी सेतू संदर्भात एक अतिशय महत्त्वाच आणि मोठे अपडेट समोर आली आहे.
खरंतर राजधानी मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी शिवडी ते न्हावासेवा दरम्यान सागरी सेतू तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) म्हणून ओळखले जात आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कमी होणार आहे. सध्या स्थितीला मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास एका तासांपर्यंतचा वेळ खर्च करावा लागत आहे. काही प्रसंगी तर 80 ते 90 मिनिटांचा देखील काळ लागतो. मात्र मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे.
दरम्यान या प्रकल्पाच्या कामाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून हा प्रकल्प केव्हा सुरू होऊ शकतो याबाबत काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू लवकरच मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे.
या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 98% एवढे काम पूर्ण झाले आहे. विशेष बाब अशी की उर्वरित दोन टक्के काम देखील जलद गतीने पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. शासनाच्या माध्यमातून देखील हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केव्हा सुरू होणार प्रकल्प
एमटीएचएल प्रकल्प हा गेल्या महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे गेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली होती. विशेष म्हणजे वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने देखील हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
पण तरीही हा प्रकल्प अपेक्षित वेळेत पूर्ण झालेला नाही. मात्र आता या प्रकल्पाचे 98% काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे नवीन वर्षात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर वाहने सुसाट धावणार आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक खुला झाल्यानंतर यावर सुमारे १०० किमी प्रतितास वेगाने वाहने चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे. परिणामी राजधानी मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान होईल.
या पुलावरून दररोज सुमारे एक लाख वाहने ये-जा करतात, अशी एमएमआरडीएची अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन एमएमआरडीएने पुलावर 3 अग्निशमन आणि बचाव वाहने आणि 2 रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
खरतर एमटीएचएल प्रोजेक्ट अंतर्गत तयार होणाऱ्या 22 किमी लांबीच्या पुलाचा 16 किमीचा भाग हा समुद्राच्या वर आहे. पुलाचा मोठा भाग समुद्राच्या वर असल्याने आपत्कालीन मदतीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. गरज भासल्यास पुलावरच तातडीने मदत देण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.
सध्या काय काम केले जात आहे?
या प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूचे बहुतांश काम हे प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे 98 टक्के काम झाले आहे. दोन टक्के काम बाकी आहे. यानुसार, सध्या विद्युत खांब बांधणे, टोलनाका, प्रशासकीय इमारत यासह इतर अनेक छोटी-छोटी कामे केली जात आहेत.
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे आता येत्या एक ते दीड महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण होते का आणि नवीन वर्षात हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला होतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.