Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2024 संदर्भात. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै च्या टप्प्यात देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. मात्र जुलैमध्ये राज्यात भरपूर पाऊस झाला.
कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला अन काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती देखील तयार झाली होती. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे.
पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये तर पूरजन्य स्थिती तयार झाली होती. संपूर्ण देशाचा विचार केला असता जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा 1.8% अधिक पाऊस झाला.
या काळात दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त आणि पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या भागात जवळपास 19 टक्के पाऊस कमी झाला आहे. तसेच मध्य भारतात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त होते.
दरम्यान आता मान्सूनच्या उर्वरित दोन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये भारतात पाऊसमान कसे राहणार ? या संदर्भात भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे.
ऑगस्टमध्ये कसे राहणार महाराष्ट्राचे हवामान ?
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर देशात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात राज्यातील खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या तीन विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यातही सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या दुसऱ्यां टप्प्यात कसे राहणार पाऊसमान ?
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अर्थातच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे. दुसरीकडे संपूर्ण भारताचा विचार केला असता या दोन महिन्यांच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहणार असे सांगितले गेले आहे. देशातील बहुतांशी भागांमध्ये या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहणार आहे.
पण ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भारतात, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारतातच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पाहायला मिळू शकतो असे देखील हवामान खात्याने आपल्या या मान्सून 2024 च्या सुधारित हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारतीय हवामान खात्याचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.