Maharashtra New Airport : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात विविध रस्ते विकासाची आणि रेल्वे विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
फक्त रस्ते आणि रेल्वेच नाही तर विमान वाहतूक देखील सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न झाले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये विमान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नवीन विमानतळ विकसित करण्यात आले आहेत.
काही विमानतळ प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले आहेत तर काही विमानतळांचे काम अजूनही सुरूच आहे. पुणे विमानतळाचा विस्तार करण्यासाठी विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल तयार केले जात आहे.
विशेष म्हणजे पुण्यातील या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन ते तीन आठवड्यात याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान याच विमानतळासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा हा मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे.
31 मार्च 2025 ला या विमानाचा पहिला टप्पा सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. अर्थातच 13 जानेवारी 2024 ला ज्योतिरादित्य शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली.
पाहणी केल्यानंतर शिंदे यांनी सिडकोसह नवी मुंबई विमानतळाच्या संबंधित यंत्रणेसोबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या प्रकल्पासंदर्भात सविस्तर आढावा घेतला. आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाविषयी महत्त्वाचे अपडेट दिली. शिंदे यांनी सांगितले की नवी मुंबई येथे तयार होत असलेले विमानतळ हे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ आहे.
आतापर्यंत या प्रकल्पाचे 60% एवढे काम झाले असून 31 मार्च 2025 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होईल अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकल्प 5 टप्प्यात उभारण्यात येणार आहे.
यातील पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रितपणे खुला केला जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक रनवे याचा समावेश राहणार आहे. हाच पहिला टप्पा मार्च 2025 मध्ये व्यावसायिक वापरासाठी सुरू होण्याची शक्यता आहे.