महाराष्ट्रात तयार होणार 190 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ! ‘या’ जिल्ह्यातुन जाणार, कधी सुरु होणार काम ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरूच आहेत. आपल्या राज्यातही महामार्गांचे जाळे विणले जात आहे. सध्या राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा एक्सप्रेस वे 701 KM लांबीचा आहे.

आतापर्यंत या प्रवेश नियंत्रित महामार्गाचा 625 km भाग वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. नागपूर ते इगतपुरी यादरम्यानचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला असून यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे या महामार्गाचा बाकी राहिलेला 76 किलोमीटरचा टप्पा देखील लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा टप्पा ऑगस्ट महिना अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊ शकणार आहे.

एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच या महामार्गासंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता या महामार्गाचा नांदेडपर्यंत विस्तार केला जाणार आहे. यासाठी जालना ते नांदेड या दरम्यान नवीन महामार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग १९० किमी लांबीचा राहणार आहे. या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गाचे काम सहा पॅकेजमध्ये केले जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यासाठी मागविलेल्या निविदांना चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या महामार्ग प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या.

यासाठी इच्छुक कंपन्यांनी एकूण 23 निविदा सादर केल्या होत्या. दरम्यान, एमएसआरडीसीने कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांच्या आर्थिक निविदा नुकत्याच खुल्या केल्या आहेत.

या महामार्गाच्या उभारणीसाठी अप्को आणि माँटेकार्ले या कंपन्यांनी प्रत्येकी दोन निविदा दाखल केल्या आहेत, तर पीएनसी इन्फ्रा आणि रोडवे सोल्युशन या कंपन्यांनी प्रत्येकी एक निविदा दाखल केली आहे.

आता या निविदांचे मूल्यांकन करून येत्या महिनाभरात प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

यामुळे येत्या काही महिन्यात या महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नांदेड मधील जनतेला जलद गतीने विदर्भात आणि राजधानी मुंबईत पोहोचता येणार आहे. यामुळे नांदेड ते मुंबई हा प्रवास गतिमान होणार आहे.

Leave a Comment