भारतातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रात ! 35 तासांचा प्रवास अवघ्या 18 तासांवर येणार, कसा आहे रूट ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. देशात सध्या रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. आतापर्यंत देशभरात विविध मोठ-मोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली असून भविष्यात अजूनही अनेक महामार्ग विकसित होणार आहेत. सध्या देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग मुंबई ते दिल्ली दरम्यान विकसित होत आहे.

या 1350 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई परस्परांना जोडले जाणार असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास बारा तासांवर येणार आहे. सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करायचा असेल तर 24 तासांचा कालावधी लागतो.

परंतु जेव्हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे बांधला जाईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे. यामुळे मुंबईकरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या महामार्गाचा फायदा होऊ शकणार आहे. विशेष बाब म्हणजे देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तर महाराष्ट्रातून जाणारच आहे शिवाय देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार असून या महामार्गाचे काम नजीकच्या काळात सुरू होणार आहे. हा महामार्ग 1271 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

हा महामार्ग सुरत आणि चेन्नई या दोन्ही शहरांना जोडणार असून हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.

याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी जवळपास 50 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामुळे देशातील वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.

सुरुवातीला हा महामार्ग चार पदरी राहणार आहे. मात्र भविष्यात हा महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी बनवला जाऊ शकतो. सध्या या दोन्ही शहरा दरम्यानचे अंतर 1600 किलोमीटर एवढे आहे. मात्र या महामार्गामुळे हे अंतर 1271 किलोमीटरवर येणार आहे.

यामुळे प्रवासाचे अंतर आणि प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने गाड्या चालवता येणार आहेत. सध्या या दोन्ही शहरादरम्यान रस्ते मार्गाने प्रवास जर केला तर 35 तासांचा कालावधी लागत आहे.

मात्र जेव्हा हा महामार्ग विकसित होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी 18 तासांवर येणार आहे. म्हणजेच प्रवाशांचे तब्बल 17 तास वाचणार आहेत. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या सहा मोठ्या राज्यांमधून हा महामार्ग जाणार आहे.

राज्यातील सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक हे तीन मोठे जिल्हे या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत. हा महामार्ग 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा होणार आहे.

Leave a Comment