मोठी बातमी ! ‘हा’ 72 किलोमीटर लांबीचा महामार्ग राजधानी मुंबईला जोडला जाणार, नितीन गडकरी यांची मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यातील काही प्रकल्प आगामी काही दिवसात सुरू होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या महामार्गाचा आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू झालेला आहे. उर्वरित बाकी राहिलेला ७६ किलोमीटर लांबीचा टप्पा देखील जुलै 2024 मध्ये सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबई शहरात देखील गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक वेगवान झाला आहे.

मुंबईला नुकत्याच काही दिवसांपूर्वी अटल सेतू आणि कोस्टल रोड सारख्या भव्य प्रकल्पांची भेट मिळाली आहे. अटल सेतू अर्थातच शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान तयार झालेल्या भारतातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास वेगवान झाला आहे.

एवढेच नाही तर या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. या अटल सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास जलद होऊ लागला आहे. अशातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी मुंबईकरांना एक अतिशय कामाची अपडेट दिली आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडल वरून दिलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईला लवकरच एक नवीन प्रकल्प जोडला जाणार आहे.

यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. गडकरी यांनी या रस्ते प्रकल्पाची देशवासीयांना माहिती दिली असून या रस्त्याचे फोटो देखील आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवरून शेअर केले आहेत. मंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता बेंगळुरूसोबत जोडले जाणार आहे.

बेंगळुरू हे शहर मुंबईच्या आणखी जवळ येणार आहे. या दोन्ही शहरांमधील अंतर आता कमी होणार अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कर्नाटकातील चित्रदुर्ग- दावणगिरी इथं हा 72 किमी अंतराचा सहा पदरी रस्ता तयार झाला आहे.

हा रस्ता कर्नाटकात तयार झाला असला तरी देखील याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे. या रस्त्याचा तेथील प्रवाशांना तर फायदा होणारच आहे शिवाय हा पर्यावरण पूरक पर्यायांवर भर देत तयार करण्यात आलेला रस्ता मुंबई आणि बेंगळुरू या दोन शहरांमधील अंतर कमी करणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर आणि बेंगलोर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हा सदर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे.

यासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांचा एकूम खर्च अपेक्षित आहे. गडकरी यांच्या माहितीनुसार हा प्रकल्प कर्नाटकातील नेलमंगला ते देवीहल्ली या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 चा एक भाग राहणार आहे.

Leave a Comment