महाराष्ट्रातील ‘या’ बड्या शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्थानक ! 2025 मध्ये होणार सुरू, कसे असणार नवीन स्टेशनं ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Railway Station : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे सह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. यामुळे मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये आता पायाभूत सुविधांवर मोठा ताण येऊ लागला आहे.

यामध्ये रेल्वे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता रेल्वे वाहतूक सुधारित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.

याचं प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका बड्या महानगरात एक नवीन रेल्वे स्थानक तयार केले जाणार आहे. ठाण्यात एक नवीन रेल्वे स्टेशन तयार होणार आहे.

खरेतर सध्या स्थितीला असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेचं कारण आहे की आता ठाण्यात एक नवीन रेल्वे स्टेशन तयार होणार आहे. ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या जागेत हे नवीन रेल्वे स्टेशन प्रस्थावित करण्यात आले असून याचे कामही सुरू झाले आहे.

यासाठी 144 कोटी आणि 80 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. खरंतर गेल्या काही महिन्यापूर्वी या नवीन रेल्वे स्थानकाला रेल्वे कडून तांत्रिक मान्यता मिळाली होती.

पण रेल्वे स्थानकासाठी लागणारी जागा ही मनोरुग्णालयाच्या ताब्यात होती. दरम्यान उच्च न्यायालयाने जागा रेल्वे स्थानकासाठी देण्यास मार्च 2023 मध्ये परवानगी दिली.

मनोरुग्णालयाची 14.83 एकर जागा नवीन रेल्वे स्थानकासाठी हस्तांतरित करण्यात आली. यानंतर नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

विशेष बाब म्हणजे या नवीन रेल्वे स्थानकाचे काम 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे.

त्यामुळे सध्या स्थितीला असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार बहुतांशी कमी होईल आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment