Maharashtra News : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारने शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला होता.
गेल्या दिवाळीमध्ये देण्यात आलेला हा आनंदाचा शिधा राज्यातील गोरगरीब जनतेसाठी खूपच फायदेशीर ठरला आणि या गोरगरीब जनतेचा सण गोड झाला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकला गेला. या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक झाले.
यामुळे गदगद झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थातच 14 एप्रिल निमित्त पुन्हा एकदा शंभर रुपयात आनंदाचा शिधा देऊ केला. गुढीपाडव्याला मात्र आनंदाचा शिधा येण्यास बराच विलंब झाला होता.
त्यावेळी सुरू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. परंतु उशिराने का होईना शंभर रुपयात देण्यात आलेला आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांचा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्ष अभिनंदन गोड करून गेला.
दरम्यान आज अर्थातच 18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आनंदाच्या शिधाबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गौरी गणपती आणि दिवाळी सणाला पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गौरी गणपतीला आणि दिवाळीच्या सणाला शंभर रुपये आता राज्यातील रेशन कार्ड धारक नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. निश्चितच राज्य शासनाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा देणारा राहणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. यामुळे या महागाईच्या काळात गौरी-गणपतीला आणि दिवाळीला फराळाचे पदार्थ बनवणे गोरगरीब जनतेला देखील शक्य होणार आहे.