शासकीय कागदपत्रांवर 1 मे 2024 पासून आईचे नाव लावणे बंधनकारक ! तुम्हाला सर्व कागदपत्र बदलावे लागणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने मार्च 2024 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय मार्च महिन्यात झाला आहे मात्र याची अंमलबजावणी या चालू महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच होणार आहे. एक मे पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच सर्वसामान्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचा भडीमार देखील सुरू झाला आहे.

अनेकांच्या माध्यमातून आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याने आम्हाला सर्व कागदपत्रे नव्याने काढावे लागणार का, विवाहित महिलेच्या बाबतीत काय प्रक्रिया राहणार, विवाहित महिलेला आपल्या नावाच्या पुढे आधी आईचे नाव आणि मग नवऱ्याचे नाव लावावे लागणार का ? असे अनेक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार ?

सरकारने कोणत्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार आहे याची माहिती दिली आहे. सरकारने म्हटल्याप्रमाणे जन्माचा दाखला, शाळेत ऍडमिशन घेताना भरलेला अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जमिनीचा सातबारा उतारा, प्रॉपर्टीशी संबंधित सर्व डॉक्युमेंट, शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, सर्व शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लिप, रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावण बंधनकारक करण्यात आल आहे.

सर्वच शासकीय कागदपत्रे बदलावे लागणार का

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वर नमूद केलेल्या शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र तुमच्याकडे सध्या स्थितीला जे कागदपत्र आहे त्याच्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार नाही.

म्हणजे सध्याच्या कागदपत्रात कोणताच बदल करण्याची गरज नाही. कारण की एक मे 2024 नंतर ज्या बालकांचा जन्म होईल त्यांनाच हा निर्णय लागू राहणार आहे.

विवाहित महिलेलाही आईचं नाव लिहावं लागणार का

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले असल्याने विवाहित महिलांनी कसं नाव लिहायचं हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की लग्न झालेल्या महिलांच्या बाबतीत सध्या जी पद्धत सुरु आहे म्हणजे आधी महिलेचं नाव मग तिच्या पतीचं नाव आणि नंतर आडनाव ही जी पद्धत सुरु आहे तीच कायम राहणार आहे.

ज्या महिलांना आपल्या लग्नाआधीचं नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये ठेवायचं आहे त्यांना ती मुभाही त्यांना देण्यात आली आहे. एवढेच नाही तर जे अनाथ मुलं असतील किंवा आणखी काही अपवादात्मक प्रकरणं असतील तर अशा प्रकरणांमध्ये देखील यातून सूट देण्यात आली आहे.

Leave a Comment