खुशखबर..! आता पत्रकारांना मिळणार ‘इतकी’ पेन्शन, 2 दिवसात जीआर जारी करणार, शिंदे सरकारचे आश्वासन 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन दिले जात आहे. खरंतर, या अंतर्गत सध्या ज्येष्ठ पत्रकारांना 11,000 रुपये इतके निवृत्ती वेतन दिले जात आहे.

मात्र वाढती महागाई पाहता हे निवृत्तीवेतन खूपच तोकडे आहे. अशा स्थितीत यामध्ये भरीव वाढ करण्याची मागणी पत्रकारांनी लावून धरली होती. ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सुरू झालेली ही निवृत्तीवेतन योजना कौतुकास्पद असली तरीही या अंतर्गत दिले जाणारे निवृत्तीवेतन हे खूपच कमी असल्याचे बोलले जात होते.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निवृत्तीवेतनात 9000 ची वाढ केली जाईल असे आश्वासन दिले होते. अर्थातच ज्येष्ठ पत्रकारांना 20 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन दिले जाईल असे त्यांनी आश्वासनात नमूद केले होते.

अशातच मंगळवारी अर्थातच काल 25 जुलै रोजी विधान परिषदेत राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्या वतीने याविषयीचा शासन निर्णय अर्थातच जीआर येत्या दोन दिवसात निर्गमित केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विधान परिषदेत पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापित करण्याबाबतची लक्षवेधी आमदार धीरज लिगाडे, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केली होती. यावर मंत्री देसाई यांनी महामंडळ स्थापित करणे शक्य नसले तरी पत्रकारांना ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याचा शासन प्रयत्न करेल असे सांगितले.

यात राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांच्या मागण्यांबाबत अभ्यास गट नेमला जाईल आणि राज्यातील पत्रकार संघटनांच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन विकास समितीच्या मार्फत दिला जाईल, असे त्यांनी यावेळी विधान परिषदेत नमूद केले.

खरतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत पत्रकारांना लाभ मिळवण्यासाठी निवृत्तीचे वय 58 वर्षे आणि 25 वर्षे अनुभव ही अट आहे. मात्र या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर देखील मंत्री महोदय यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि या योजनेअंतर्गत असणाऱ्या जाचक अटी रद्द होतील असे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment