Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला आहे. खरतर राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेअंतर्गत दररोज पोषण आहाराचे वाटप केले जाते.
मात्र आता या पोषण आहारात मोठा बदल होणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना आहारातून चांगले पोषक घटक मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पोषण आहार योजनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता पोषण आहारासोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून अंडा बिर्याणी, अंडा पुलाव तसेच फळांचे वाटप केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाने पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय तसेच अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासोबतच पुरक आहार देण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार, आता राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंडा बिर्याणी किंवा अंडी न खाणाऱ्यांसाठी केळी, चिकू, पेरू यापैकी एक फळ दिले जाणार आहे.
शासनाने या संदर्भातील निर्णय नुकताच घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना याची अंमलबजावणी करण्यास सांगितले गेले आहे.
यामुळे आता राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना लवकरच चविष्ट अंडा पुलाव, अंडा बिर्याणी तसेच नॉनव्हेज न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी, चिकू, पेरू सारखी फळे दिली जाणार आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शालेय आहारातून चांगले पोषक घटक मिळतील असा आशावाद व्यक्त होत आहे.
आता राज्यातील विद्यार्थ्यांना आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी पोषण आहारासोबतच हा पूरक आहार दिला जाणार आहे. दरम्यान या पूरक आहाराचा अहमदनगर जिल्ह्यातील 4546 शाळांमध्ये 4,57,192 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
23 आठवड्यांकरिता सुरू राहणार उपक्रम
मीडिया रिपोर्टनुसार, शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम पुढील 23 आठवड्यांसाठी सुरू राहणार आहे. म्हणजेच हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहणार नाही. फक्त पुढील 23 आठवड्यांसाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या अंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात पूरक आहार दिला जाणार आहे. जे विद्यार्थी अंडे खात नाहीत त्यांना स्थानिक फळ जसे केळी, चिकू, पेरू खाण्यासाठी दिले जाणार