Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक रस्ते विकासाची कामे अजूनही सुरूच आहेत. दळणवळण व्यवस्था सुधारावी यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाले असून यामुळे राज्याची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन महामार्गांची कामे पूर्ण केली जात आहेत तर काही सध्याच्या मार्गांची दुरुस्तीची कामे देखील केली जात आहेत.
मांढरदेव ते भोरदरम्यानच्या रस्त्याचे देखील दुरुस्तीकरणाचे काम सुरू आहे. मांढरदेव ते भोर दरम्यानच्या घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामासाठी हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा घाट मार्ग पुढील 20 ते 25 दिवसांसाठी बंद केला जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही महिन्यांपासून भोर ते मांढरदेव तसेच वाई ते मांढरदेव या रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्यांच्या कामामुळे मांढरदेव येथे काळुबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तथा दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
यामुळे रस्त्यांचे हे सुरू असलेले काम जलद गतीने पूर्ण व्हावे आणि स्थानिकांना तथा श्रीक्षेत्र मांढरदेव येथे दर्शनासाठी येणाऱ्या काळुबाईच्या भक्तांना दिलासा मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेच कारण आहे की आता या रस्त्यांच्या कामांनी वेग पकडला असून या रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर सध्या स्थितीला भोर घाटातील महत्वाचा टप्पा असलेल्या वरवडी कॉर्नर नावाच्या ठिकाणच्या यू अकराच्या वळणाजवळ काम सुरू आहे. त्याठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता वाहतूक सुरू असताना काम करणे थोडे रिस्की ठरत आहे.
त्यातच काळुबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील खूपच अधिक असते. यामुळे रुंदीकरणाचे काम करताना अडचणी येत आहेत. भाविकांची गर्दी अन भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी आणि अपघाताचे संभाव्य धोके लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंताच्या वतीने भोर ते मांढरदेव हा घाट रस्ता आजपासून अर्थातच 3 मे 2024 पासून पुढील 20 ते 25 दिवसांसाठी बंद करण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच हा घाट मार्ग आता पुढील 20 ते 25 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.