Maharashtra News : राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी समोर येतेये ती महावितरणकडून. खरतर, महावितरण राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते.
विविध योजनेच्या माध्यमातून महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देखील दिले जाते. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याने आणि वाढत्या महागाईमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर वीजबिल भरणा करता येत नाही.
तसेच विज बिल भरणा करताना देखील सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ज्या लोकांना ऑनलाइन बिल भरता येत नाही अशा लोकांना बिल भरण्यासाठी नागरिकांना महावितरणच्या केंद्रात जावे लागते, किंवा बँकेत जावे लागते. त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जातो.
परिणामी वीज बिल वसुली वेळेवर व्हावी, वीज ग्राहकांना विज बिल भरताना कोणतीच अडचण येऊ नये यासाठी विज बिल भरणाचे अनेक पर्याय महावितरणने उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट, मोबाईल पेमेंट, महावितरणच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पेमेंट, बँकेत जाऊन विज बिल भरणा करता येत होते.
दरम्यान आता या सुविधा सुरू असतानाच महावितरणने विज बिल भरण्यासाठी आणखी एक नवीन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आता वीज ग्राहकांना किराणा दुकानात आणि मेडिकलच्या शॉपीवर देखील वीज बिल भरता येणार. यासाठी संबंधित दुकानदारास आणि मेडिकल ओनरला डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे.
या वॉलेट मध्ये किमान 5000 पासून ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत पैसे भरण्याची सुविधा राहणार आहे. म्हणजे महावितरणच्या या डिजिटल वॉलेट मध्ये पैसे भरणा करून दुकानदारांना तसेच मेडिकलवाल्यांना ग्राहकांकडून विज बिल भरून घेता येणार आहे.
डिजिटल पेमेंट वॉलेट कसं सुरु केलं जाईल
एखाद्या गावातील किंवा शहरातील दुकानदाराला तसेच मेडिकल वाल्यांना जर हे डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यायचे असेल तर त्याला यासाठी महावितरण कडे अर्ज सादर करावा लागेल. तसेच संबंधित दुकानदार आणि मेडिकल शॉपी वाल्याला या वॉलेट मध्ये पैसे देखील जमा करावे लागतील.
कोण कोणती कागदपत्रे लागतील?
मिळालेल्या माहितीनुसार मेडिकल आणि दुकान चालकाला हे डिजिटल पेमेंट वॉलेट घेण्यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रद्द केलेला धनादेश या कागदपत्रांचा समावेश राहणार आहे.
पडताळणी नंतर अर्ज मंजूर होणार
किराणा आणि मेडिकल शॉपी वाल्यांना अर्ज पडताळणी केल्यानंतर आणि त्याच्या दुकानाची जागा पडताळणी केल्यानंतर हे डिजिटल पेमेंट वॉलेट उपलब्ध होणार आहे. या वॉलेटमध्ये सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार.
कसं भरलं जाणार वीजबिल
वीज ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यासाठी आलेले बिल किंवा महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठीचा प्राप्त झालेला मेसेज दाखवावा लागेल. तसेच विज बिल भरणा केल्यानंतर संबंधित दुकानदाराकडून ग्राहकांना पावती देखील मिळणार आहे.
किराणा दुकानदाराला मिळणार कमिशन
विज बिल भरणा करण्याच्या मोबदल्यात दुकानदाराला इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे. प्रत्येक वीज बिलामागे चार ते पाच रुपये कमिशन दुकानदाराला देण्याची सुविधा देखील राहणार आहे. अर्थातच यामुळे दुकानदारांच्या उत्पन्नात भर पडणार आहे, त्यांना कमाईचे नवीन साधनही उपलब्ध होणार आहे.