पुणे, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते कोल्हापूर प्रवास करण्यासाठी एसटीची ‘ही’ बससेवा सुरू, केव्हा होणार सुरु ? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune to Kolhapur New Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटीच्या माध्यमातून राज्यभरातील एसटी प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एसटी महामंडळ प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा तसेच, त्यांना प्रवासादरम्यान कोणतीच अडचण येऊ नये, त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहिले आहे.

दरम्यान आता पुणे ते कोल्हापूर दरम्यान एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण की, या मार्गावरील एसटी प्रवाशांना आता महामंडळाकडून एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. या गिफ्टमुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी होण्यास मदत मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची सर्वात आरामदायी बस म्हणून ओळख प्राप्त असलेल्या शिवनेरी बसला या मार्गावर सुरू केले जाणार आहे. आरामदायी आणि वातानुकूलित बस म्हणून या गाडीवर प्रवास करण्यास प्रवासी नेहमीच पसंती दाखवतात.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे ते मुंबई या मार्गावर एसटी महामंडळाची शिवनेरी बस सेवा सुरू होती. मात्र या मार्गावर आता इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीत तेथील शिवनेरी बसला आता राज्यातील दुसऱ्या मार्गावर वळविण्याचे काम सुरु आहे.

तसेच मुंबई शिवाय इतर दुसऱ्या शहरांसाठी सुरू होणाऱ्या या शिवनेरी बसला ‘जन शिवनेरी’ असे नाव देण्यात आले आहे. ही जन शिवनेरी बस याआधी पुणे-नाशिक मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या पुणे-नाशिक मार्गावर सुरू झालेल्या या जन शिवनेरी बसला प्रवाशांनी उस्फुर्त असा प्रतिसादही दाखवला आहे.

यामुळे एसटी महामंडळ गदगद झाले असून आता इतरही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे ते कोल्हापूर दरम्यान ही जन शिवनेरी बस सुरू होणार असल्याची खात्रीशीर माहिती आमच्या हाती आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्गावर साधारणपणे 10 जन शिवनेरी बस सुरू करण्याची नियोजन एसटी महामंडळाने आखले आहे. येत्या आठवड्यात ही जन शिवनेरी बस या मार्गावर धावेल आणि पुण्यातील स्वारगेट येथून ही बस कोल्हापूरसाठी धावणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. 

Leave a Comment