Maharashtra News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे.
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन राज्यात बीजेपीने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसला फक्त तामिळनाडू या एकमेव राज्यात सत्ता काबीज करता आली.
या विधानसभा निवडणुकांमध्ये पीएम मोदींची जादू कामी आली तर काही जनकल्याणकारी योजना देखील बीजेपीला कामी आल्यात असा दावा केला जात आहे. मध्यप्रदेशबाबत बोलायचं झालं तर एमपीमध्ये मामा शिवराज यांनी सुरू केलेली लाडली बहना योजना ही सुपरहिट ठरली आहे.
या योजनेअंतर्गत तेथील महिलांना 1,500 रुपये प्रतिमहीना अशी मदत दिली जात आहे. म्हणून MP मध्ये लाडली बहना योजनेमुळेच भाजपाला बहुमत मिळाले असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशमधील हाच फंडा आता महाराष्ट्रात देखील वापरला जाणार आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
महिला वोट बँक हा अलीकडील काही इलेक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महिला ज्या पक्षाला बहुमत देतात त्याच पक्षाचे सरकार स्थापित होते.
अशा परिस्थितीत, राज्यातील महिलांना 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी खुश करण्यासाठी वर्तमान सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना एक जानेवारी 2024 पासून राबवली जाणार असून या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख रुपयाची रक्कम भेट दिली जाणार आहे.
अशातच आता शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काल अर्थातच बुधवारी शासनाने विधानसभेत राज्यातील महिलांना मोफत साडी देण्याची घोषणा केली आहे.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, मकर संक्रांतीपासून ते होळीपर्यंत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील जवळपास 24 लाख 58 हजार कुटुंबातील महिलांना प्रत्येकी एक मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच यंत्रमागधारकांकडूनचं या साड्यांची खरेदी केली जाईल असे आश्वासन देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहे.