Maharashtra Old Highway : सध्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्ग सारख्या हायटेक महामार्गांची निर्मिती केली जात आहे. सध्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यान तयार होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत सहाशे किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू देखील झाला आहे. विशेष म्हणजे उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम देखील लवकरच पूर्ण होणार अशी आशा आहे.
दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गाचे काम देखील येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होण्याची आशा आहे. शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान तयार होणार असून या महामार्गाची लांबी 802 किलोमीटर एवढी राहणार आहे.
एकंदरीत राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. दरम्यान आज आपण राज्यातील सर्वात जुन्या महामार्गाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण मुंबई ते पुणे दरम्यान तयार करण्यात आलेल्या द्रुतगती महामार्गा विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात जुना महामार्ग आहे.
या महामार्गाला राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महामार्ग अर्थातच मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात जुना महामार्ग असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे हा देशातील पहिला असा महामार्ग आहे जो की सहा पदरी कॉंक्रीट प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. हा महामार्ग अतिजलद वाहनांसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा महामार्ग देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे.
हा महामार्ग रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे यांना परस्परांना जोडतो. देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा एक महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प आहे.
नवी मुंबई जवळील कळंबोली येथून हा महामार्ग सुरू होतो आणि पुण्यातील किवळे येथे हा महामार्ग संपतो. दुचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टर सारख्या वाहनांना या महामार्गावर प्रवेश नाहीये. येथे पायी चालणाऱ्या प्रवाशांना देखील परवानगी नाकारली गेली आहे.
विशेष म्हणजे या महामार्गावर वाहनांना थांबता येत नाही. हा महामार्ग 94.5 किलोमीटर लांबीचा असून यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त आणि फक्त दोन तासात पूर्ण होत आहे. या महामार्गासाठी 1630 कोटी रुपयांचा खर्च आला होता. या महामार्गाला पाच इंटरचेंज आहेत.