आशिया खंडातील सर्वात उंच पूल आपल्या महाराष्ट्रात ! मुंबई ते पुणे प्रवासातील 30 मिनिटांचा वेळ वाचणार, केव्हा सुरु होणार प्रकल्प ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Pune Mumbai Missing Link Project : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहे तर काही प्रकल्पांची कामे नजीकच्या भविष्यात सुरू होणार आहेत. येत्या काही दिवसात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असणारा पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील सुरू होणार आहे.

अशातच मात्र पुणे आणि मुंबईमधील सर्वसामान्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरासाठी महत्त्वाचा असा एक रस्ते प्रकल्प येत्या काही महिन्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या चालू वर्षात अर्थातच 2024 मध्ये पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे हा प्रवास गतिमान होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत जवळपास 30 मिनिटांपर्यंतची बचत होणार आहे.

कारण की मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच वाहतुकीसाठी सुरू होणार असा दावा होऊ लागला आहे.

एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.

विशेष म्हणजे उर्वरित 15 टक्के काम देखील लवकरात लवकर कसे होणार यासाठी प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे हे बाकी राहिलेले काम देखील येत्या काही दिवसात पूर्णत्वास येणार आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत खालापूर टोल ते खोपोली एक्‍झिटपर्यंत आठ लेनचा रस्ता विकसित केला जात आहे. खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीचे काम या प्रोजेक्ट अंतर्गत केले जात आहे.

यात दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठपदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील बोगद्याची रुंदी २३.५ मीटर एवढी आहे. मुंबईकडून पुण्याकडे एक किलोमीटर लांबीचा बोगदा आणि पुण्याहून मुंबईकडे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जात आहे.

सध्या या बोगद्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात आशिया खंडातील सर्वाधिक उंचीचा केबल ब्रिज देखील तयार होणार आहे. या केबल ब्रिजची लांबी ६४५ मीटर आणि उंची १३५ मीटर एवढी असणार आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे या प्रवासातील सहा किलोमीटरचे अंतर वाचणार आहे आणि प्रवाशांचा 20 ते 25 मिनिटांचा वेळ देखील वाचणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार या मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होण्याची अशी आहे.

Leave a Comment