Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या स्थितीला लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील सुरू आहेत. या चालू महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण देखील येणार आहे.
अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रवाशांची वाढलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी पाहता दादर रेल्वे स्थानकावरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर ते गोरखपुर दरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. एक गाडी अप मार्गावर आणि एक गाडी डाऊन मार्गावर चालवली जाणार आहे.
म्हणजेच एक गाडी दादर ते गोरखपुर आणि एक गाडी गोरखपुर ते दादर अशा दोन गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना विशेषतः शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे हे देखील आता आपण पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
या विशेष गाड्या शिक्षकांसाठी आरक्षित राहणार असल्याने शिक्षकांना या रेल्वे गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. उन्हाळी सुट्टीत गावाकडे जाणाऱ्या शिक्षकांसाठी या ट्रेन फायदेशीर ठरतील अशी आशा आहे. सुट्ट्यामध्ये फिरायला जाण्यासाठी निघालेल्या शिक्षकांसाठी देखील या विशेष आरक्षित गाड्या फायदेशीर ठरणार आहेत.
या ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर 2 मे 2024 ला दादर येथून दुपारी 14:05 वाजता ही गाडी गोरखपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि गोरखपूरला तिसऱ्या दिवशी मध्ये रात्री 2:45 वाजता पोहोचणार आहे.
तसेच गोरखपूरहुन ही गाडी 10 जूनला दुपारी 14:25 वाजता दादरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मध्य रात्री तीन वाजून 30 मिनिटांनी ही गाडी दादर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, रानी कमलापति स्टेशन, बीना, ललितपूर, टीकमगढ़, खड़गपूर, महाराजा छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, वाराणसी, ओंरिहार, मऊ, भटनी आणि देवरिया या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.