Maharashtra Railway News : तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एका अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. वास्तविक राज्यासह संपूर्ण भारतात प्रवासासाठी रेल्वेला विशेष प्राधान्य दिले जाते. अनेक जण रेल्वेने प्रवास करतात.
रेल्वे प्रवास खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेच्या नेटवर्क हे कानाकोपऱ्यात आहे. परिणामी कुठेही जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध असते. अशा परिस्थितीत दैनंदिन कामासाठी किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते.
दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सांगली – मिरज स्थानकादरम्यान दुहेरीकरण व नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २६ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे या मार्गावरील बहुतांशी एक्सप्रेस गाड्या अंशता रद्द होणार आहेत. तसेच काही एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण या कामांमुळे कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द राहणार आणि कोणत्या एक्सप्रेस गाड्या अंशता रद्द होणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या एक्सप्रेस गाड्या राहणार रद्द
मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या कामांमुळे अकोला, पूर्णा, लातूर, कुर्डूवाडी मार्गे धावणारी कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेस २९ डिसेंबर, १ जानेवारी, ५ जानेवारी या तीन दिवसांसाठी रद्द केली जाणार आहे. याशिवाय, नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस ३० डिसेंबर, २ जानेवारी, ६ जानेवारी या तीन दिवसांसाठी रद्द राहणार आहे.
परिणामी या एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार आहे. निश्चितच नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच हे काम हाती घेण्यात आले असल्याने रेल्वे प्रवाशांची नवीन वर्षाची सुरुवातच अडचणींनी परिपूर्ण राहणार आहे.
या गाड्या होणार अंशता रद्द
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कामांमुळे नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस २६ डिसेंबर रोजी कुर्डूवाडी रेल्वेस्थानकापर्यंतचं धावणार आहे. अर्थातच या गाडीचा पुढील प्रवास रद्द राहणार आहे. गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस देखील २५ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहे.
म्हणजे या गाडीचा पुण्याच्या पुढे कोल्हापूरकडील प्रवास रद्द राहणार आहे. तसेच कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २६ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत पुणे स्थानकावरुन सुटणार आहे. अर्थातच ही गाडी या कालावधीत कोल्हापूर येथून सुटणार नाही.