Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसात होळीचा सण सुरू होणार आहे. दरम्यास होळीच्या सणाला रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी अनेक जण होळीच्या सणाला गावाकडे परतणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेने होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर होणारी संभाव्य अतिरिक्त गर्दी पाहता 19 ते 27 मार्च या कालावधीत विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या विशेष साप्ताहिक ट्रेनसाठी आठ मार्च 2024 पासून आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे या विशेष साप्ताहिक ट्रेनचा कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
कसा राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचा रूट
हाती आलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद ते मडगाव दरम्यान ही विशेष साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला आहे. या दोन स्थानकादरम्यान दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
वेळापत्रक कसे राहणार ?
अहमदाबाद-मडगाव जंक्शन यादरम्यान गाडी क्रमांक ०९४१२ ही विशेष साप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे. ही ट्रेन अहमदाबाद जंक्शन येथून १९ आणि २६ मार्चला सोडली जाणार आहे.
तसेच मडगाव जंक्शन-अहमदाबाद जंक्शन ही विशेष साप्ताहिक गाडी मडगाव जंक्शन येथून सोडली जाईल. ही गाडी २० आणि २७ मार्च रोजी रात्री ८ वाजता सोडली जाणार आहे.
कुठं थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला वडोदरा जंक्शन, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार आहे.