पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर सुरू होणार पीएमपीची नवीन बससेवा, इलेक्ट्रिक एसी बस धावणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्याची लाईफ लाईन अर्थातच पीएमपीच्या बससेवा संदर्भात आहे. ज्याप्रमाणे राजधानी मुंबई तेथील लोकल सेवेला लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते.

त्याच धर्तीवर पुण्यातील पीएमपीला देखील येथील लाईफलाईन म्हणून संबोधले तर काही वावगे ठरणार नाही. कारण की, पीएमपीच्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या शहरात खूपच अधिक आहे.

दरम्यान पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीने रामवाडी मेट्रोस्थानक ते लोहगाव विमानतळ दरम्यान पूरक बस सेवा सुरू केली आहे.

या मार्गावर दर 25 मिनिटांनी गाड्या सोडल्या जाणार आहेत. तिकीट दर अंतरानुसार पाच ते दहा रुपये राहील अशी माहिती समोर येत आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नुकताच पुण्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाला नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे. बुधवारपासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे.

दरम्यान महा मेट्रो कडून ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर आता पीएमपीच्या माध्यमातून रामवाडी ते विमानतळ यादरम्यान फिडर सेवा सुरू करण्यात आली आहे.

यादरम्यान सुरू झालेल्या या फिडर बस सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या मार्गावर धावणाऱ्यां पीएमपीच्या बसेस एसी इलेक्ट्रिक बसेस राहणार आहेत.

रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळ (सोकोरे नगर मार्गे) या मार्गावरील पूरक सेवेत हयात हाॅटेल, वेकफिल्ड कंपनी, साकोरे नगर, नेक्सा शोरूम, विमाननगर लेन क्रमांक २१ आणि २२, क्रोमा माॅल अशा ठिकाणी पीएमपी ची इलेक्ट्रिक एसी बस थांबा घेणार आहे.

तसेच, संजय पार्क लेन क्रमांक ६ मार्गे धावणाऱ्या गाडीचा मार्ग लोहगाव विमानतळ, क्रोमा माॅल, सिंबायोसिस काॅलेज, विमाननगर, संजय पार्क लेन क्रमांक ६, मारुती सुझुकी शोरूम, साकोरे नगर, चेक-मेट हाॅटेल, रामवाडी असा या गाडीचा मार्ग राहणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांना मोठा दिलासा

Leave a Comment