Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट तयार होत आहे. पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे, राज्यभरातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असा अंदाज आहे.
जस की आपणास ठाऊकच आहे की, 16 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली होती. या कालावधीत झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पण, आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिकचे तापमान पाहायला मिळतंय. यामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे.
वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी उष्माघाताची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे नागरिकांना विशेष सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा या परिस्थितीत मात्र पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे.
वादळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान विभागाने नेमका काय हवामान अंदाज दिला आहे, राज्यातील कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणतय भारतीय हवामान विभाग ?
इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट अर्थातच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. विदर्भ विभागातील अकोल्यात 42.8 अंश सेल्सिअस, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये 42 अंश सेल्सिअस तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावात 41 अंश सेल्सिअस पर्यंतचा तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मार्च महिना आता जवळपास समाप्तीकडे आहे आणि तापमानाने देखील नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या तापमान वाढीमुळे मात्र अंगाची अक्षरशः लाहिलाही होत आहे. परंतु राज्यातील काही भागांमधील नागरिकांना या वाढत्या तापमानापासून दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ विभागात भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, 30 आणि 31 मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
31 मार्च रोजी विदर्भ विभागातील अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपुर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहणे अपेक्षित असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.