Maharashtra Rain Alert : आजपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानाचे आणि मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गणेशोत्सवाच्या सणाला दणक्यात सुरुवात होणार आहे.
या गणेशोत्सवाच्या सणाला वरूनराजा देखील आपली हजेरी लावणार आहे. यामुळे हा गणेशोत्सवाचा पावन सण बळीराजाच्या चेहऱ्यावर देखील आनंद आणत आहे. कोकणात आज सकाळपासूनच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात पुढील चार दिवस पावसाची अशीच परिस्थिती कायम राहणार आहे.
मात्र राज्यातील कोकण आणि विदर्भ या दोनच विभागात पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. गणरायाच्या आगमनासोबतच म्हणजे आज सकाळीपासूनच मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे आगामी 24 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासात राज्यातील चार ते पाच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईसह कोकणातील पालगर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता कायम आहे.
राज्याच्या इतर भागातून मात्र पाऊस गायब होईल असे सांगितले जात आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि यामुळे सध्या राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. याचा थेट परिणाम म्हणून कोकणात पावसाला सुरवात होणार आहे.
यामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागामध्येही पावसाची दमदार हजेरी असणार आहे. याशिवाय, सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावर सुद्धा आज पाऊस होणार असा अंदाज आहे. विशेष बाब अशी की परतीच्या पावसाची तारीख देखील लांबली आहे. यंदा परतीचा पाऊस राज्यातून 14 ते 15 ऑक्टोबर नंतर बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.