Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही.
या सप्टेंबर महिन्यात अजूनही राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेली नाहीये. यामुळे ज्या भागात पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडेच आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा हवामान अंदाज वर्तवला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उद्या अर्थातच 20 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे. उद्या राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक समवेत संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ विभागात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी यावेळी वर्तवला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील काही भागात उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. यामुळे ज्या भागात अद्याप चांगला मोठा पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असे सांगितले जात आहे. खरंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. यामुळे तेथील शेतकरी बांधव मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
अशा परिस्थितीत जर पंजाबरांचा हा अंदाज खरा ठरला आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात चांगला मोठा पाऊस बरसला तर तेथील शेतकऱ्यांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे. पंजाबरावांनी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच विदर्भ विभागातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
यामुळे या संबंधित विभागातील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबरावांनी यावेळी केले आहे. तसेच त्यांनी राज्यातील उजनी, जायकवाडी आणि मांजरा या प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढेल आणि लहान-लहान धरणे लवकरच भरतील असे देखील यावेळी सांगितले आहे.