Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. आता मात्र पावसाची तीव्रता वाढली आहे. काल मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या संबंधित भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
मात्र, अजूनही काही भागातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैचा पहिला पंधरवडा उलटला आहे तरीही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे मुसळधार पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहेत.
तथापि राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचे पुनरागमन झाले असल्याने आणि पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊन कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने दणका दिला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान मात्र दिसत आहे.
दरम्यान आजही भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
काही ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आज देखील राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यातील काही जिल्ह्यांना रेड आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्याला आज रेड अलर्ट मिळाला आहे.
तसेच आज दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती अशा 11 जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. पण, कालपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
आता फक्त सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा राहिली आहे. दरम्यान, हवामान शास्त्र विभागातील काही तज्ञांनी 18 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर चांगला जोरदार पाऊस पडणार असा अंदाज यावेळी व्यक्त केला आहे.