Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस झाला. कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत सापडलेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात मुसळधार पाऊस झाला नाही.
मात्र गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे यात शंकाच नाही. पण, राज्याच्या काही निवडक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. अजूनही असे अनेक जिल्हे आहेत जिथे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाला कधीपासून सुरुवात होणार ? हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. आता याच संदर्भात हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञांनी मोठी माहिती दिली आहे. सेवानिवृत्त शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, लवकरच महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 13 जुलैपर्यंत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. 10, 11, 12 आणि 13 जुलैला राज्यातील कोंकण विभागात सर्वात जास्त पाऊस म्हणजे अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भ विभागात सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय संपूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात मात्र या कालावधीत किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थातच मराठवाड्यात पावसाचे प्रमाण पुढील काही दिवस कमी राहणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.
कारण की लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. 14 जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजेच 18 जुलै पर्यंत महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
14 जुलै ते 18 जुलै या कालावधीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज समोर आला आहे. सध्या राज्यातील विविध भागांमध्ये जसा पाऊस पडत आहे त्यापेक्षा अधिक पाऊस या कालावधीत पडू शकतो असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
प्रामुख्याने दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. त्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वाटत आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर 14 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली तर नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अन खरीप हंगामातील पिकांना यामुळे नवीन संजीवनी मिळणार आहे.