Maharashtra Rain : गेल्या 17 ते 18 दिवसांपासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात परतला असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर काही भागात पावसाने तब्बल वीस ते पंचवीस दिवसांपासून दडी मारली आहे. अशा परिस्थितीत या भागातील पिकांना याचा मोठा फटका बसला असून अनेक भागात दुबार पेरणीची परिस्थिती ओढावली आहे.
मात्र आता गेल्या काही तासापूर्वी पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आता खरीप हंगामातील पिकांना पुन्हा जीवदान मिळेल आणि पिके टवटवीत होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. काल अर्थातच 18 ऑगस्ट शुक्रवारी राज्यातील काही भागात हलका पाऊस झाला आहे.
तर काही ठिकाणी चांगला पाऊस बरसला आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून हवामान खात्याकडून पावसा संदर्भात तारीख पे तारीख दिली जात होती मात्र पाऊस काय बरसत नव्हता. तारीख उलटत होती मात्र पाऊस येत नव्हता. अखेर कार हवामान विभागाचा अंदाज आता खरा ठरला आहे. हवामान विभागाने 18 तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल अशी भविष्यवाणी केली होती.
यानुसार कालपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. इकडे नासिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आभाळाकडे नजरा असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने 22 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज शनिवारी म्हणजेच 19 ऑगस्टला राज्यातील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त आज विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या अर्थातच 20 ऑगस्ट रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष बाब अशी की मुंबई सह कोकणात देखील पाऊस पडणार आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आयएमडीच्या माध्यमातून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी अर्थातच उद्या 20 ऑगस्टला कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी लागणार असा अंदाज आहे.
एवढेच नाही तर कोकणात 21 आणि 22 ऑगस्टलाही दमदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. निश्चितच भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे.