Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. मध्यंतरी एक दोन दिवस वादळी पाऊसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आता अवकाळी पाऊस गेला असे वाटत होते.
पण तो परत आला आहे. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. यावेळी अवकाळी पाऊस विदर्भात नव्हे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात बरसणार आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
काल, मंगळवारी राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आज पासून पुढील चार दिवस पावसाचे राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
म्हणजे अवकाळी पावसाचा मुक्काम 20 एप्रिल पर्यंत राहणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर येथे आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा विभागात देखील आज आणि उद्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. IMD ने या कालावधीत पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव, नाशिक, बीड, हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. वादळी पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंग झालेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पशुधनाची देखील काळजी घ्यावी असे जाणकारांनी सांगितले आहे.
मान्सून 2024 कसा राहणार ?
अवकाळी पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून 2024 बाबत हवामान खात्याने आपला पहिला अंदाज दिला आहे.
यामध्ये हवामान खात्याने यंदा महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षी मान्सूनचे वेळेवर म्हणजेच आठ जूनला आगमन होणार असे IMD ने म्हटले आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्याचा काळात 91.5 सेंटीमीटर पाऊस होणार आहे.
यंदा 106% पाऊस पडेल असे बोलले जात आहे. एल निनोचे सावट नाहिशे होत ला निना सक्रिय होईल अन चांगला पाऊस होईल असे म्हटले जात आहे. यामुळे हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.