Maharashtra Rain : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानातं घट होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे-पहाटेच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याने आता थंडीची अनुभूती येऊ लागली आहे.
खरंतर गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रकोप पाहायला मिळत होता. ऑक्टोबर हीट मुळे नागरिक परेशान झाले होते. यामुळे आता थंडीला केव्हा सुरुवात होणार हा सवाल आहे नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील कमाल आणि किमान तापमान हळूहळू घट होत असल्याने आता ऑक्टोबर हिट पासुन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अशातच आता भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने राज्यात नोव्हेंबर मध्ये थंडीचा जोर कसा राहील, अवकाळी पावसाची शक्यता आहे की नाही याबाबत सविस्तर असे अपडेट दिले आहे. हवामान खात्याने काल अर्थातच 31 ऑक्टोबर 2023 रोजी नोव्हेंबर 2023 चा सविस्तर हवामान अंदाज जारी केला आहे.
कसं राहणार नोव्हेंबर महिन्यातील हवामान
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर कमी राहणार असा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील कमाल तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
यामुळे थंडीचे प्रमाण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कमी राहील अशी शक्यता आहे. मात्र देशाच्या मध्य भारत आणि अतिउत्तरेकडील भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात नोव्हेंबर महिन्यात सरासरी जवळपास 119 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा मात्र दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील बऱ्याच भागात यंदा नोव्हेंबर मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे.
तसेच ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्चिमेकडील काही भागांतही November मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे. उर्वरित भारतात मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस राहणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आता नोव्हेंबर महिन्यातही राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे.
आय एम डी ने सांगितले की नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता कायम राहणार आहे. एल निनोची स्थिती कायम राहणार असल्याने यंदा नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रसह देशातील विविध भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून थंडीची तीव्रता नोव्हेंबर मध्ये कमी राहू शकते अशी परिस्थिती तयार होत आहे.