Maharashtra Rain : जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र, आता गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलका पाऊस होणार असा अंदाज आहे. IMD ने सांगितले की, आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज आहे.
दरम्यान, आज आपण ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवस महाराष्ट्रात कस हवामान राहणार, कोणत्या भागात पाऊस पडणार, कुठं पावसाचा खंड राहणार याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार ऑगस्टमधील हवामान ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्यांचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा हा उत्तरेकडे सरकला आहे. यामुळे पाऊस होण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती तयार होत नाही. तसेच, दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे.
वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्याच्या मधील क्षेत्र (शिओर झोन) देखील दक्षिणेकडे सरकला आहे. ही सारी परीस्थिती राज्यात मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल नसल्याचे मत हवामान विभागाच्या तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यातील कोकण, विदर्भ आणि घाटमाथावरील काही भागात हलका पाऊस होईल.
यानंतर मात्र पावसाचा जोर खूपच कमी होणार आहे. अर्थातच राज्यात आज आणि उद्या काही भागात हलका पाऊस पडेल. मात्र यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. राज्यात ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवस हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवस पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे.
खरंतर जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 17% अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, राज्यातील सर्वच विभागात सारखा पाऊस पडलेला नाही. शिवाय सर्वच विभागात सारखा पाऊस पडलेला नाही. काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे तर काही जिल्ह्यात जास्त पाऊस झाला आहे.
यामुळे ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यातील शेती पिके ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणार नसल्याचा अंदाज असल्याने धोक्यात सापडतील, पिके करपतील असे सांगितले जात आहे.