Maharashtra Rain News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक भागातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा यासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव अन मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अशा विविध भागांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
यामुळे मात्र नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अशातच मात्र हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज नुकताच सार्वजनिक केला आहे.
यामुळे ऐन उन्हाळ्यात पाऊस येणार गारव्यासारखा अशी परिस्थिती तयार होणार आहे. आय एम डी ने राज्यात पुन्हा एकदा चार दिवस पावसाचे राहणार असा अंदाज दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून अर्थातच 5 एप्रिल 2024 पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पाच एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पाऊस होणार असून या कालावधीत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात आणखी दोन ते तीन अंश सेल्शियसची वाढ होईल अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात हवेची द्रोनीय स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात आद्रता वाढणार आहे आणि याचमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी शक्यता आहे.
5 एप्रिलपासून पुढील चार दिवस अर्थातच आठ एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, पाच ते आठ एप्रिल दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
6 ते आठ एप्रिल दरम्यान कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच सात आणि आठ एप्रिलला महाराष्ट्रातील विदर्भ विभागात पाऊस बरसणार असा अंदाज यावेळी हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
परंतु या कालावधीत राज्यातील कमाल तापमानात सुद्धा दोन ते तीन अंश सेल्शियसची वाढ होणार आहे. खरे तर गेल्या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील काढणी केलेला शेतीमाल वाया गेला होता.
आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होऊ शकते असे बोलले जात आहे. त्यामुळे निश्चितच उकाड्याने हैराण जनतेला दिलासा मिळणार आहे परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त होत आहे.