मुंबईकरांसाठी गुड न्यूज, राजधानीत ‘या’ ठिकाणी तयार होणार पाच नवीन रेल्वे स्थानके !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात मुंबई शहर आणि उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता देशात वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे. विशेष म्हणजे देशात लवकरच बुलेट ट्रेन देखील धावणार आहे.

यामुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. दुसरीकडे मुंबई शहरातील लोकलचा प्रवास देखील आणखी जलद आणि सोयीचा व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत.

याचाच एक भाग म्हणून आता मुंबईकरांना लवकरच पनवेल ते कर्जत दरम्यान लोकलने प्रवास करता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पनवेल ते कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगद्याचे काम देखील जवळपास पूर्ण होण्यात जमा आहे. या बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून या प्रकल्पांतर्गत तीन हजार 144 मीटर लांबीच्या पुलाचे काम देखील 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.

यामुळे लवकरच या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळानेच ही माहिती दिलेली आहे. यामुळे लवकरच पनवेल ते कर्जत दरम्यान लोकल सेवा सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे.

MUTP 3 या प्रकल्पाअंतर्गत याचे काम सुरू आहे. खरे तर सध्या स्थितीला पनवेल ते कर्जत दरम्यान एक मार्गीका सुरु आहे. परंतु याचा वापर हा लांब पल्याच्या गाड्या अन मालवाहतुकीसाठी होतो.

यामुळे कर्जत आणि पनवेल मधील नागरिकांना सध्या स्थितीला ठाणे आणि कुर्लाला वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प येथील प्रवाशांसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पनवेल, चौक, मोहपे, चिखले, कर्जत ही पाच नवीन रेल्वे स्थानके तयार होणार आहेत. हा 56 किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग राहणार असून या प्रकल्पाचे काम 2025 मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे.

म्हणजे 2025 मध्ये पनवेल ते कर्जत अशी लोकल सुरू होईल, असे बोलले जात आहे. एकंदरीत या प्रकल्पामुळे मुंबईमधील लोकल वाहतूक आणखी सोयीची होणार आहे.

Leave a Comment