घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षात फक्त इतकेच सिलेंडर मिळणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder : घरगुती गॅस ग्राहकांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची ठरणार आहे. खरे तर केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यामुळे आता आपल्या देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

गॅस सिलेंडरमुळे ग्रामीण भागातील चुल्ही आता हद्दबाहेर झाल्या असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान जर तुम्हीही घरगुती गॅस सिलेंडरचे वापरकर्ते असाल, ग्राहक असाल तर तुम्हाला गॅस कंपन्यांचे काही नियम ठाऊक असणे आवश्यक आहे.

खरेतर एका वर्षात एका कुटुंबाला किंवा एका कनेक्शनला किती गॅस सिलेंडर दिले जाऊ शकतात याबाबतचे नियम तेल कंपन्यांनी तयार केलेले आहेत. यानुसार एका वर्षात बारा सिलेंडर दिले जाणार आहेत.

जर समजा यापेक्षा अधिक सिलेंडर आवश्यक असतील तर आणखी 3 सिलेंडर म्हणजे 15 गॅस सिलेंडर दिले जाऊ शकतात. मात्र वर दिल्या जाणाऱ्या तीन सिलेंडरवर सबसिडी मिळणार नाही.

अशा तऱ्हेने एका वर्षात ग्राहकांना फक्त पंधरा सिलेंडर मिळू शकणार आहेत. संपूर्ण वर्षभरात फक्त 213 किलो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) उपलब्ध होईल, असा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलेला आहे.

213 किलो गॅस म्हणजेच 14.2 किलो ग्रॅम गॅस प्रमाणे एकूण पंधरा गॅस सिलेंडर एका वर्षात मिळू शकणार आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या कुटुंबाला यापेक्षा अधिकच्या गॅस सिलेंडरची गरज भासली तर मग काय करायचे हा मोठा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित झाला आहे.

दरम्यान, इंडियन ऑईलचे जिल्हा नोडल अधिकारी कुमार गौरव यांनी सांगितले की, घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी ही प्रणाली अथवा नियम तयार करण्यात आले आहेत.

पण जर घरात खप जास्त असेल म्हणजे अधिकचे गॅस सिलेंडर लागत असेल तर दुसरे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. ज्या घरांमध्ये जास्त सदस्य एकत्र राहतात, तेथे दर महिन्याला एलपीजीचे एक सिलेंडर पुरतं नाही.

अशा कुटुंबांमध्ये महिन्याला एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर लागतात. सण किंवा लग्नसमारंभात एलपीजीचा वापर आणखी वाढतो.

पण एका महिन्यात दोन सिलिंडर जर घ्यायचे असतील तर अशा कुटुंबांना किमान दोन कनेक्शन घ्यावे लागणार आहेत. मात्र, नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Leave a Comment