Maharashtra Rain : गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेरकार महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. तब्बल 25 ते 26 दिवसाच्या खंडानंतर महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दस्तक दिली आहे. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरिपातील पिके करपण्याच्या स्थितीत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजा सुखावला आहे. वास्तविक जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या पावसाळी काळा पैकी तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. आता केवळ मान्सूनचा शेवटचा महिना शिल्लक राहिला आहे.
या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात आता चांगला पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. कारण की गेल्या तीन महिन्या पैकी दोन महिन्यात राज्यात सरासरी एवढा देखील पाऊस पडलेला नाही. गेल्या ऑगस्ट महिन्यात तर सरासरीचा 40% पाऊस झाला आहे. म्हणजेच पावसाची तब्बल 60 टक्के तूट गेल्या महिन्यात नमूद करण्यात आली आहे. यामुळे खरिपातील पिके मरणयातना सहन करत आहेत.
जर आणखी काही काळ चांगला पाऊस झाला नाही तर खरिपातील पिके जळून खाक होतील. दरम्यान आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशातच हवामान विभागाने पावसाबाबत आणखी एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. पुण्यातील हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील 48 तासात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता राज्यात पाऊस पाडण्यासाठी मदत करणार आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रातील अस्थिर वातावरणामुळे येत्या 48 तासात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने येत्या 48 तासात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक भागात मुसळधार त बहूतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज पुणे वेधशाळेने यावेळी व्यक्त केला आहे.