Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंचे कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. कारण की, उन्हाळ्यात पुन्हा एकदा उकळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 43°c पर्यंत पोहोचले असून राज्यात उष्णतेची लाट आली आहे. सूर्य आग ओकत असल्याने सर्वसामान्य अक्षरशः हैरान, परेशान झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे.
मात्र अशा या परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. परंतु आय एम डी ने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असली तरी देखील उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा कायम ठेवलेला आहे.
हवामान खात्याने पुढील तीन दिवस अर्थातच 9 एप्रिल 2024 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात तीन दिवस पावसाचे जरूर आहेत परंतु कोणत्या जिल्ह्यात पाऊस बरसणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आज आपण याच संदर्भात आता भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महाराष्ट्रात पाऊस नेमका कुठे पडणार ?
7 एप्रिल 2024 : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सात एप्रिल अर्थातच रविवारी राज्यातील मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यासोबतच जळगाव धुळे नंदुरबार तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
8 एप्रिल 2024 : हवामान विभागाने त्या अर्थातच आठ एप्रिल ला राज्यातील विदर्भ विभागातील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे. उद्या विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाज आयएमडीने दिलेला असून या पार्श्वभूमीवर या सदर दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आणि संपूर्ण मराठवाडा अर्थातच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
9 एप्रिल 2024 : 9 एप्रिल ला अर्थातच मंगळवारी राज्यातील चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज दिला गेला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्हे म्हणजे नागपूर, अकोला, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोलीत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.