आनंदाची बातमी, SBI बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank FD News : देशातील पब्लिक सेक्टरमधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या ग्राहकांसाठी अर्थात एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एसबीआय बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार बँकेने 31 मार्च 2024 ला बंद होत असलेल्या एफडी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेतर एसबीआयने अमृत कलश ही विशेष एफडी योजना सुरु केली आहे.

31 मार्च 2024 ही या एफडी योजनेत गुंतवणुकीची अंतिम मुदत होती. मात्र आता एसबीआयने या एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे एसबीआयच्या या एफडी योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसबीआय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आता अमृत कलश एफडी योजनेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणे शक्य होणार आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण एसबीआय बँकेच्या या विशेष अमृत कलश एफडी योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या अमृत कलश एफडी योजनेत किती कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते, यावर किती व्याजदर मिळतो यांसारख्या सर्वच बाबींची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया एसबीआयच्या अमृत कलश FD योजनेची सविस्तर माहिती.

SBI अमृत कलश एफडी योजना 

बँकेची अमृत कलश स्पेशल FD स्कीम ही एक चारशे दिवसांची एफडी योजना आहे. ही बँकेची विशेष एफडी योजना असून यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांना आता 30 सप्टेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

त्यानंतर मात्र या एफडी योजनेत गुंतवणूक करता येणे शक्य होणार नाही. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याज दिले जात आहे.

यातून मिळणारे व्याज गुंतवणूकदार मासिक, तिमाही आणि सहामाही आधारावर काढू शकणार आहेत. SBI अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर, TDS कापल्यानंतर व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जोडले जातात.

अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांपूर्वी काढले गेल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50% ते 1% कमी व्याजदर वजा करू शकते.

या FD मध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करता येऊ शकते. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँक कर्ज सुविधा देखील प्रदान करते.

Leave a Comment