Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आयएमडीने 31 मार्च पर्यंत म्हणजेच आज अखेरपर्यंत पावसाचे हे सत्र सुरूच राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
तुम्हाला आठवतच असेल की, मार्च महिन्याची सुरुवात ही अवकाळी पावसाने झाली होती. दरम्यान आता मार्च महिन्याची एंडिंग देखील अवकाळी पावसानेच होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. चिंता वाढण्याचे कारण असे की रब्बी हंगामातील पिके आता अंतिम टप्प्यात आहेत. रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
अशा परिस्थितीत, जर पाऊस कोसळला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शेतकरी बांधव चिंतातूर असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान आयएमडीने आज देखील राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
आता मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पण राज्यातील यवतमाळ, अमरावती, अकोला या 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असा अंदाज यावेळी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामुळे या सदर जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यात पावसाची सुद्धा शक्यता आहे आणि उष्णतेची लाट येणार असाही अंदाज आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
विदर्भातील अनेक भागातील तापमान 40 ते 42°c दरम्यान पोहोचले आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा जास्तीचे तापमान नमूद केले जात आहे. त्यामुळे तिथे उष्णतेची लाट आली असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष बाब अशी की एप्रिल आणि मे महिन्यात देशात याहीपेक्षा अधिकचे तापमान नमूद केले जाईल असे म्हटले जात आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा हा चांगलाच तापदायक ठरणार आहे.