सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बँका राहणार बंद? महाराष्ट्रात कोणत्या तारखेला राहणार बंद ? RBI ने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra September Banking Holiday News : गेल्या काही वर्षांपासून देशभरात बँकिंग व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. आता देशातील बहुतांशी नागरिकांचे बँकेत अकाउंट ओपन झाले आहे. विशेषतः जनधन योजनेनंतर बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. दरम्यान देशातील सर्व बँकेतील ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

खरंतर आज ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच आज महिना अखेर आहे. आता उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची माहिती हाती आली आहे. ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत.

यामुळे जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात बँकेत प्रत्यक्ष जाऊन काही काम करायचे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यावे लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी प्रकाशित केली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात 16 दिवस बँकेला सुट्ट्या राहणार अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यात विविध सणवार येत आहेत. यामुळे बँक हॉलिडेज वाढले आहेत. दरम्यान आता आपण या सोळा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये कोणत्या राज्यातील बँका किती दिवसांसाठी बंद राहतील याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील बँका किती दिवसासाठी बंद राहतील हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

बँकेतील सुट्ट्याची यादी खालील प्रमाणे 

 • 3 सप्टेंबरला रविवार असल्याने देशभरात सर्वत्र बँका बंद राहणार आहेत.
 • 6 सप्टेंबरला कृष्णजन्माष्टमी असल्याने या दिवशी भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पटना येथील बँका बंद राहणार आहेत.
 • 7 सप्टेंबरला कृष्ण जन्माष्टमी निमित्त अहमदाबाद, चंदीगढ, डेहराडून, गंगटोक, तेलंगण, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर या ठिकाणी बँक बंद राहणार आहे.
 • 9 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्याने देशात सर्वत्र बँका बंद राहतील.
 • 10 सप्टेंबरला आणि 17 सप्टेंबरला रविवार असल्याने या दिवशी देशात सर्वत्र बँका बंद राहणार आहेत.
 • 18 सप्टेंबरला विनायक चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरू, तेलंगणा येथे बँक बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.
 • 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे अर्थातच गणेश चतुर्थी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर या दिवशी अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी या ठिकाणी बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.
 • 20 सप्टेंबरलाही काही भागात गणेश चतुर्थी नुआखाईमुळे बँकेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी कोची, भुवनेश्वर येथील बँका बंद राहणार आहेत.
 • 22 सप्टेंबरला नारायण गुरू समाधी दिवस असल्याने या दिवशी कोची, पणजी, त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.
 • 23 सप्टेंबरला चौथा शनिवार असल्याने देशात सर्वत्र बँकेला सुट्टी राहणार आहे.
 • 24 सप्टेंबर रविवार असल्याने देशात सर्वत्र बँका बंद राहणार आहेत.
 • 25 सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेव जयंती निमित्त गुवाहाटीला बँक बंद राहणार आहे.
 • 27 सप्टेंबरला मिलाद- ए शरीफ या मुस्लिम बांधवांच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जम्मू, कोची, श्रीनगर, त्रिवेंद्रममध्ये बँक बंद राहणार अशी माहिती समोर आली आहे.
 • 28 सप्टेंबरला ईद ए मिलाद उन नबी आणि अनंत चतुर्दशी निमित्त अहमदाबाद, आईजोल, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगण, इम्फाळ, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील अशी माहिती समोर आली आहे. 
 • 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त गंगटोक, जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद राहणार?

महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यामध्ये चार रविवारी, दोन शनिवारी आणि 19 सप्टेंबर रोजी अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी, 28 सप्टेंबर रोजी अर्थातच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तसेच ईद-ए-मिळादूच्या पार्श्वभूमीवर बँका बंद राहणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात एकूण आठ दिवस बँकांना सुट्टी राहणार अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment