महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! एसटी सुरू करणार खास स्लीपर बस, अशी राहणार बसचे वैशिष्ट्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra ST Sleeper Bus : महाराष्ट्रात लाल परीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. एसटीचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एसटीला मोठं स्थान आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ देखील एसटी प्रवाशांसाठी कायमचं नवनवीन सुविधा सुरू करते. दरम्यान प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून स्लीपर बस सुरू केल्या जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या गाड्या सुरु केल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या स्लीपर बसची बांधणी देखील पूर्ण झाली आहे. आगामी काही दिवसात या बसला प्रवाशांसाठी सुरू केले जाणार आहे. सध्या एका बसची बांधणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात दहा नवीन स्लीपर बस बांधून तयार केल्या जाणार आहेत.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील कार्यशाळेत राज्यातील पहिली शयनयान म्हणजेच स्लीपर बस तयार झाली आहे. तसेच या बसची आरटीओकडे नोंदणी देखील झाली आहे. आता येत्या काही दिवसात दहा नवीन स्लीपर बस बांधून त्या वेगवेगळ्या विभागांना दिल्या जाणार आहेत.

खरंतर एसटी महामंडळाच्या माध्यमातून शिवशाही, शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, हिरकणी, विठाई अशा विविध प्रकारच्या एसी बस चालवल्या जात आहेत. पण एसटी महामंडळ स्लीपर बस चालवत नव्हती. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बस मधून प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दाखवली आहे.

यामुळे एस टी महामंडळाने देखील स्लीपर बस सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती. यानुसार गेल्या काही महिन्यांपूर्वी महामंडळाच्या माध्यमातून स्लीपर बस बांधण्याची घोषणा करण्यात आली. यानुसार दापोडी येथे 50 स्लीपर बस बांधण्याचे काम सुरू आहे.

यापैकी पहिल्या बसची बांधणी पूर्ण झाली आहे. या बसची आरटीओकडे पासिंग देखील झाली आहे. ही पहिली बस कोकण विभागाला दिली जाणार आहे. तसेच आगामी काही दिवसात नवीन दहा स्लीपर बस बांधल्या जातील आणि या बसेस वेगवेगळ्या विभागाला दिल्या जाणार आहेत.

कशी आहे स्लीपर बस

एस टी महामंडळाची स्लीपर बस बारा मीटर लांब आहे. याबाबतची 2.6 मीटर रुंदी आहे आणि 3.6 मीटर एवढी उंची आहे. या नवीन स्लीपर बस मध्ये 30 प्रवाशी प्रवास करू शकतात. चालक व वाहकाच्या बाजूला दोन्ही ओळीत शयनयान रचना करण्यात आली आहे. बसच्या मागील बाजूस रिवर्स कॅमेरा आहे.

चालकच्या केबिनमध्ये इमर्जन्सी मध्ये अनाउन्सिंग सिस्टम आहे. प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी डाव्या बाजूला सोय आहे. बसमधील खिडक्यांना पडदे बसवण्यात आले आहेत. प्रत्येक बर्थ मध्ये चार्जिंगची सोय आहे. प्रत्येक बर्थ मध्ये वाचनासाठी आणि निळ्या रंगाचा नाईट लॅम्प आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मागील बाजूस दरवाजा आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आसन व्यवस्था आहे.

Leave a Comment