Maharashtra State Board Result : 10 वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. खरंतर, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परीक्षा झाल्यापासून निकालाची आतुरता लागलेली आहे. बोर्ड परीक्षेचा रिजल्ट केव्हा डिक्लेअर होणार हाच प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र बोर्ड अर्थातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे रिझल्ट जारी करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याची संभाव्य तारीख समोर येत आहे. खरेतर दरवर्षीप्रमाणे यंदाही सीबीएससी बोर्डाचा रिझल्ट आधी लागेल आणि त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट लागणार आहे.
केव्हा जाहीर होणार निकाल
मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी बारावीचा निकाल हा लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता दाट आहे. मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिकांची तपासणी युद्ध पातळीवर सुरू असल्याने आणि उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या जाणार अशी शक्यता व्यक्त होत असल्याने बारावी बोर्डाचा निकाल हा मे च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवली जात आहे.
10वी च्या निकालाबाबत बोलायचं झालं तर दहावीचा निकाल हा लोकसभेतच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार जूनला जाहीर होणार आहे, तर दहावीचा निकाल हा त्यापूर्वी अर्थातच एक, दोन किंवा तीन जूनला जाहीर होऊ शकतो अशी शक्यता आहे.
कुठं पाहणार निकाल
दहावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. मग Maharashtra SSC and HSC result या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर, तुमची जन्मतारीख आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार आहे. ही डिटेल भरल्यानंतर तुमचा रिझल्ट स्क्रीनवर डिस्प्ले होईल. यानंतर तुम्ही या रिझल्टची प्रिंटआऊट घेऊ शकता.
एस एम एस द्वारे देखील रिझल्ट पाहता येणार
एसएमएसने रिझल्ट पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला 577666 या नंबर वर एसएमएस करावा लागणार आहे. जर तुम्हाला दहावीचा रिझल्ट पाहायचा असेल तर MHSSC लिहून पुढे तुमचा बोर्ड परीक्षेचा रोल नंबर असा एसएमएस पाठवावा लागणार आहे.
जर तुम्हाला बारावीचा रिझल्ट पाहायचा असेल तर MHHSC लिहून पुढे तुमचा बोर्ड परीक्षेचा रोल नंबर टाकून एसएमएस पाठवायचा आहे.