Maharashtra State Employee : केंद्र शासनाने मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने देखील याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू केला आहे. विशेष बाब अशी की पुढल्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली जाणार आहे.
म्हणजेच या संबंधित लोकांचा महागाई भत्ता आता 45 टक्के एवढा होणार आहे. मात्र असे असताना महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही 34% एवढाच महागाई भत्ता मिळत आहे. एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती.
एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात त्यांनी ही घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची घोषणा जवळपास दोन महिने पूर्ण झाले तरीही ही घोषणा प्रत्यक्षात खरी उतरलेली नाही. यामुळे घोषणेची अंमलबजावणी केव्हा होणार? असा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे.
खरतर या संबंधित नोकरदारांच्या थकलेल्या महागाई भत्ता बाबतची फाईल मंजुरी विना मंत्रालयात पडलेली आहे. यामुळे हे सरकार एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत कायमच उदासीन राहते असा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने केला आहे.
संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेली अनेक वर्ष एसटी महामंडळात कार्यरत असलेल्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळत होता.
दरम्यान एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री महोदय यांनी याला पुन्हा एकदा उजळणी दिली आणि या संबंधित लोकांना शासकीय सेवेतील लोकांप्रमाणेच महागाई भत्ता मिळेल अशी घोषणा केली. मात्र संबंधित लोकांना अजूनही 8% थकलेला महागाई भत्ता वर्ग करण्यात आलेला नाही. यामुळे संबंधितांचा शासनाविरोधात दिवसेंदिवस रोष वाढत आहे.