मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरावरून सुरु होणार अयोध्येसाठी विमान सेवा, कस राहणार वेळापत्रक ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra To Ayodhya Flight : येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे तयार होत असलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यामुळे जगातील सर्व राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर अयोध्या येथील प्रभू श्रीरामांचे मंदिर रामभक्तांकरीता सुरू होणार आहे.

अशा परिस्थितीत संपूर्ण देशभरातून आणि जगातील अनेक ठिकाणाहून अयोध्या येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. यामुळे देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अयोध्येसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच अर्थातच 23 जानेवारीपासून राम मंदिरात जाऊन सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

याशिवाय इतरही अन्य मान्यवर या सोहळ्यासाठी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.

हेच कारण आहे की, अयोध्येत येणाऱ्या भाविकांना सहजतेने पोहोचता यावे यासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून विमान सेवा सुरू केल्या जाणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयोध्या येथील विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

देशातील अनेक शहरांमधून अयोध्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई येथूनही अयोध्येसाठी विमान सेवा सुरू होणार आहे. मुंबई ते आयोध्या ही विमानसेवा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

अयोध्येला जाण्यासाठी मुंबई येथून दुपारी साडेबारा वाजता विमान राहणार आहे. याशिवाय दिल्ली ते अयोध्या ही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली येथून आयोध्येसाठी सकाळी १० वाजता विमान सेवा उपलब्ध राहणार आहे.

दिल्ली ते अयोध्या दरम्यान दुसरे विमान हे सकाळी 11.55 वाजता उड्डाणं भरते. तसेच बंगळुरू ते अयोध्या ही विमान सेवा येत्या 17 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. बेंगलोर येथून सकाळी 8.05 वाजता अयोध्येसाठी विमान उपलब्ध राहणार आहे.

कोलकाता ते अयोध्या ही विमान सेवा 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोलकाता येथून दुपारी 1.25 वाजता अयोध्येसाठी विमान उड्डाण भरणार आहे. याशिवाय अहमदाबाद ते अयोध्या दरम्यानही विमानसेवा सुरू झाली असून अहमदाबाद येथून सकाळी 9.10 वाजता अयोध्येसाठी विमान उड्डाण भरते.

या सर्व विमानसेवा एअर इंडिया आणि इंडिगो या कंपनीच्या माध्यमातून पुरवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे स्पाईसजेट ही कंपनी देखील अयोध्येसाठी विमानसेवा पुरवणार आहे. यामुळे राम भक्तांचा प्रवास हा अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.

Leave a Comment