Maharashtra Vande Bharat Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
अशातच आता महाराष्ट्राला एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. मोदी यांनी कोल्हापूर येथे आयोजित एका प्रचार सभेत ही घोषणा केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असे म्हटले आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रक देखील मागे समोर आले होते. मात्र तदनंतर या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात कोणतीच कारवाई झालेली नाही.
आता मात्र, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी घोषणा केली असल्याने लवकरच कोल्हापूरहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
खरंतर करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र कोल्हापूरला येणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. मुंबईवरून देखील मोठ्या प्रमाणात भाविक श्रीक्षेत्र कोल्हापूरला हजेरी लावत असतात.
अशा परिस्थितीत या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर कोल्हापूरहून मुंबईला जाणे आणि मुंबईहून कोल्हापूरला येणे सोयीचे होणार आहे. या वंदे भारत ट्रेन मुळे कोल्हापूर शहरासहित जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास गतिमान होणार आहे.